Tuesday, December 18

मुंबईतल्या शाळांना 3 दिवसांची सुट्टी जाहीर

मुंबई, मुंबईत आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावरची वाहतूक उशिरानं सुरू आहे. जोरदार पाऊस आणि आणखी 2 दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्यानंतर राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. राज्यात जिथे पाणी साचलं असेल तिथे शांळांना सुट्टी देण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत.
सकाळी सात वाजेपर्यंत ४ तासात मुंबई शहरात १६२ पूर्व उपनगरात ११२ तर पश्चिम उपनगरात १६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या २४ तासात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रात्रभर मुसळधार बरसल्यावर पहाटेच्या सुमारास पावसानं विश्रांती घेतली. पण साडे सातच्या नंतर मुलुंड, भांडूप, दादर, वडाळा, बोरीवली या उपनगरांमध्ये जोरदार पावसानं पुनरागमन केलं.
मुंबईच्या बोरीवलीत गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे रात्री १०च्या सुमारास ३ घरं कोसळली. या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी पोहचल्यानं लोकांना दिलासा मिळाला. सरकार मुंबईकरांच्या स्थितीविषयी अत्यंत असंवेदनशील असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. तर पावसाच्या स्थितीवर पूर्ण लक्ष असून मुंबईच्या शाळांना मात्र आज सुट्टी देण्यात आलेली नाही असं शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी म्हटलं आहे.