Saturday, February 23

महेंद्र सिंह धोनीला पुन्हा मिळणार कर्णधारपद?

मुंबई, महेंद्र सिंह धोनी पुन्हा एकदा आपल्याला कर्णधारच्या रुपात दिसू शकतो. एक यशस्वी कर्णधार म्हणून धोनीची आज जगभर ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांना धोनीची कॅप्टन्सी पाहायला खूप आवडते. कॅप्टन कूल धोनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळू शकतो.
टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर धोनी आता चेन्नई सुपर किंगचा कर्णधार म्हणून खेळणार आहे. आयपीएलच्या एका समितीच्या नुसार पुढच्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रायल्सला दोन वर्षापासून रायजिंग पुणे सुपरजाइंट्स आणि गुजरात लायंसकडून खेळणाऱ्या खेळाडूंना पुन्हा संघात घेण्यासाठी परवानगी मिळू शकते. पुढच्या महिन्यात होणाऱ्या कार्यशाळेत फ्रेंचाइजि जर यासाठी तयार होतात तर यामुळे महेंद्र सिंह धोनीकडे चेन्नई सुपरकिंग्सचं कर्णधारपद पुन्हा येऊ शकतं. त्यामुळे धोनी पुन्हा एकदा चेन्नईकडून खेळतांना दिसू शकतो.