Sunday, January 20

महिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी; त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

परभणी, महिलेच्या त्रासाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिला वारंवार शरीरसुखाची मागणी करत असल्यानं तरुणानं राहत्या घरी गळफास लावून स्वत:चं जीवन संपवलं आहे. पोलिसांना तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
परभणीतील करुणा अपार्टमेंट राहणाऱ्या तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत त्यानं एका महिलेच्या नावाचा उल्लेख केला आहे. संबंधित महिला वारंवार आपल्याकडे शरीरसुखाची मागणी करत असल्यानं त्या त्रासाला कंटाळून आपण जीवन संपवत असल्याचं त्यानं चिठ्ठीत म्हटलं आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.