Sunday, January 20

महा‍शिवरात्रीला या पदार्थांनी करा अभिषेक, मिळवा इच्छित फळ

महाशिवरात्रीला या पदार्थांनी महादेवाचे अभिषेक करा आणि इच्छित फळ मिळवा. भिन्न-भिन्न फळ प्राप्तीसाठी भिन्न पदार्थाने अभिषेक करावे.
* पाण्याने केल्याने सुख- शांती लाभते.
* कुशोदक अर्थात कुश घास टाकलेल्या पाण्याने अभिषेक केल्याने पाप नाहीसे होतात आणि व्याधी बरी होते.
* दह्याने अभिषेक केल्याने पशू प्राप्ती होते.
* उसाच्या रसाने अभिषेक केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते.
* मधाने अभिषेक केल्याने धन-धान्य आदीची प्राप्ती होते.
* आरोग्य समृद्धीसाठी गौघृतने अभिषेक करावे.
* मोक्ष प्राप्तीसाठी तीर्थ जलाने अभिषेक करावे.
* दुधाने अभिषेक केल्यास पुत्र-पुत्रादि प्राप्ती होते.
* ताप शांत करण्यासाठी ताकाने अभिषेक करावे.
* गोड गौदुधाने अभिषेक केल्याने बुद्धीची जडता नष्ट होते.
* शत्रुनाश करायचा असेल तर मोहरीच्या तेलाने अभिषेक करावे.
* संतान कामनेसाठी गोड पाण्याने अभिषेक करावे.
तसे संध्याकाळपूर्वीच अभिषेक केलं जातं परंतू शिवरात्रीला रात्रीही अभिषेक करू शकतात.