Saturday, February 23

भ्रष्टाचार करु दिला नाही म्हणून काही जणांनी पक्ष सोडला : राज ठाकरे

नाशिक : सभेतली गर्दीच आपला विजय निश्चित करत आहे, भाजपने पैसे फेकले आणि ते गेले, पण ते एकटेच गेले आहेत, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्ष सोडणाऱ्यांना ठणकावलं. नाशिक महापालिकेवर पाच वर्षात भ्रष्टाचाराचा एकही दाग नाही, हे झालं म्हणूनच काही जणांनी पक्ष सोडला, असंही राज ठाकरे म्हणाले. नाशिक म्हणजे मनसेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची विराट प्रचार सभा पार पडली. सभेला नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. याच सभेत राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या ‘माझा शब्द’ या जाहीरनाम्याचंही प्रकाशन करण्यात आलं. काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणेच भाजप-शिवसेनेलाही सत्तेचा आणि पैशाचा माज आला आहे, असा घणाघात राज ठाकरेंनी केला. शिवसेना-भाजपने एकट्या नाशिकमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 88 उमेदवार दिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.