Sunday, January 20

भारतीय लष्कराची मोठी कारवाई, 5 पाकिस्तानी रेंजर्संना कंठस्नान

जम्मू, भारतीय लष्कराने राजौरी आणि पूँछ भागात सोमवारी मोठी कारवाई करत पाकिस्तानच्या पाच रेंजर्संना कंठस्नान घातलं. भारतीय लष्कराने केलेल्या या कारवाईत 20 पाकिस्तानी नागरिकही जखमी झाल्याचं समजतं आहे.
भारतीय सैनिकांनी केलेल्या कारवाईत तीन बंकरही उद्धवस्त झाले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील देवा गावात सर्वात जास्त नुकसान झालं आहे.
जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून गेल्या तीन दिवसांपासून (शनिवार, रविवार आणि सोमवार) शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत होतं. त्यामुळे काल भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. भारतच्या या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानी सैन्याकडून होणारे हल्ले सध्या तरी थांबले आहेत.