Sunday, January 20

भारताची वेटलिफ्टर संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी

नवी दिल्ली, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये 2014 आणि 2018 मध्ये सुवर्णपदकांची कमाई करणारी भारताची वेटलिफ्टर संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनकडून संजिता चानूवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
तिच्या नमुन्यात टेस्टॉस्टेरॉनचे अंश सापडले आहेत. संजिताकडून हा नमुना कधी घेण्यात आला होता याची माहिती अजूनही मिळालेली नाही.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिला तेराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत संजिता चानूनं ५३ किलो वजनी गटाचं सुवर्णपदक पटकावलं होतं. २०१४ साली ग्लास्गोत ती ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती.
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत संचिता चानूने विक्रम रचला होता.  संजिता चानूने 192 किलो किलो वजन उचलत भारताला सुवर्ण मिळवून दिलं, जो एक विश्वविक्रम आहे.