Saturday, February 23

फेसबुकवर झाली ओळख, भेट झाल्यानंतर मारहाण करत बलात्कार

टेक्सास, टेक्सास येथील एका तरुणीने आपण १५ वर्षांची असताना फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या मित्राने बलात्कार झाल्याचा दावा केला आहे. तरुणीने सोशल नेटवर्कच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली असून, फेसबुकला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर देहव्यापारासाठी अल्पवयीन मुलांना बळी पाडलं जात असल्याची कल्पना असल्याचा दावा केला आहे. तरुणीने हॅरीस काऊंटी डिस्ट्रिक्ट कोर्टात यासंबंधी तक्रार केली आहे. दरम्यान फेसबुकने यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
2012 मध्ये तरुणीची फेसबुकच्या माध्यमातून तरुणाशी ओळख झाली होती. फेसबुकच्या माध्यमातूनच तरुणाने तिच्याशी संवाद साधला होता. आईसोबत झालेल्या भांडणानंतर तरुणाने तिला मदत देऊ केली होती. मात्र भेट झाल्यानंतर त्याने मारहाण करत बलात्कार केला. सोबतच फोटो काढत बॅकपेज.कॉम वर अपलोड केल्याच आरोप आहे. फेसबुक आपल्या युजर्सची ओळख तपासण्यासाठी योग्य ती काळजी घेत नसल्याचाही आरोप आहे.