Saturday, February 23

फक्त 200 रुपयांत उघडा पोस्टात खातं, बँकेपेक्षा जलद होतील पैसे दुप्पट

नवी दिल्ली, पोस्ट ऑफिसला आजही लोक जुन्या काळातील योजनेच्या स्वरूपात पाहतात. त्यामुळे जास्त करून ग्राहक हे पैसे बँकेत ठेवण्यास प्राधान्य देतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही अशा प्रकारची गुंतवणूक पोस्टातही करू शकता. विशेष म्हणजे पोस्टात जमा केलेले पैसे बँकेपेक्षा दुप्पट नफा मिळवून देतात. तसेच तुमच्या पैशाचीही पोस्ट ऑफिस हमी देतो. तसेच तुम्ही पोस्टात ठेवी ठेवल्यास तुम्हाला बँकेच्या तुलनेत जास्त व्याज मिळतं. तुम्ही एफडीच्या स्वरूपात पैसे ठेवल्यास तुम्हाला विमा सुरक्षा आणि हमी तर मिळते. त्याशिवाय चांगला परतावाही मिळतो. जर बँकेला काही तोटा झाल्यास योजनेंतर्गत पैसे जमा केलेल्या ग्राहकाला फक्त 1 लाख रुपये परत मिळतात. परंतु पोस्टात असं होतं नाही. पोस्ट ऑफिस तुम्हाला तुमच्या सर्व पैशांची हमी देते.
बँकेच्या फिक्स्ड डिपॉजिटसारखीच पोस्ट ऑफिसचीही टाइम डिपॉझिट ही स्कीम आहे. ज्यात तुम्ही कमीत कमी 200 रुपयांपासून खातं उघडू शकता. तसेच जास्त रक्कम जमा केल्यास कोणतीही मर्यादा नाहीये.
या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार पाहिजे तेवढी खाती उघडू शकतो. तुमच्याकडे जास्त पैसे असल्यास तुम्ही ते वेगवेगळ्या खात्यांमध्ये भविष्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ठेवू शकता.
या योजनेंतर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वर्षाला 6.6 टक्के, दोन वर्षाला 6.7 टक्के, तीन वर्षाला 6.9 टक्के, 5 वर्षांसाठी 7.4 टक्क्यांनी व्याज मिळतं.
पोस्टात ठेवीच्या स्वरूपात गुंतवलेले पैसे तुम्ही ठरावीक मर्यादेच्या आधीही काढू शकता. परंतु त्यासाठी तुम्ही पैसे गुंतवल्यानंतर 6 महिने पूर्ण झालेले असले पाहिजेत.
जर तुम्ही 1 वर्ष, 2 वर्षं, 3 वर्षं, आणि 5 वर्षांसाठी पोस्टात खातं उघडलं असेल, परंतु तुम्ही 6 महिन्यांनंतर वर्षाच्या आत पैसे काढल्यात तुम्हाला तुमचे पैशांवर बेसिक व्याजानुसार परतावा दिला जातो.
तुम्ही ठेवीच्या मर्यादेच्या आधीच पैसे काढल्यास पोस्ट ऑफिस तुम्हाला तुमच्या सर्व पैशांसह ठरावीक व्याजाच्या 2 टक्के कमी व्याजच्या स्वरूपात परतावा देते.