Saturday, February 23

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी बेगम कुलसुम यांचे निधन

लंडन, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नीचे लंडन येथे निधन झाले, त्या 68 वर्षांच्या होत्या. बेगम कुलसुम असे त्यांचे नाव असून त्यांच्यावर लंडन येथील हार्ले स्ट्रीट रुग्णालयात उपचार सुरू होते. घशाच्या कर्करोगामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती नाजूक झाल्यानंतर त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले. आज त्यांचे निधन झाले.
सध्या नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील तुरुंगात अटकेत आहेत. पनामा पेपर्स घोटाळ्याप्रकरणी त्यांना पाकिस्तानच्या न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी नवाज यांना 10 वर्षांची तर त्यांची मुलगी मरियम यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, सन 1971 साली नवाज आणि बेगम कुलसुम यांचा विवाह झाला होता.