Saturday, August 18

‘पद्मावत’ सर्व राज्यांत प्रदर्शित करा ; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन भन्साळींनी काल (बुधवार) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने सर्व राज्यांना ‘पद्मावत’ प्रदर्शित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 25 जानेवारी या नियोजित वेळेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘पद्मावत’ला यापूर्वी विविध राजपूत संघटनांनी केलेल्या विरोधानंतर चित्रपटाचे नाव बदलण्यात आले. तरीदेखील  हरियाना, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये ‘पद्मावत’ प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भन्साळींनी काल याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयात भन्साळींच्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सर्व राज्यांना पद्मावत प्रदर्शित करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पद्मावतच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.