Sunday, January 20

पंतप्रधान मोदींनी स्वत: स्वच्छ केली शाळा

नवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘स्वच्छता ही सेवा चळवळ’ सुरु केली आहे. या नव्या चळवळीअंतर्गत मोदींनी दिल्लीतील एका शाळेत स्वत: स्वच्छता केली. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी हैदराबाद येथील भीमा मैदान रस्त्याची स्वच्छता केली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबरला 150 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही ऐतिहासिक चळवळ उभी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी या चळवळीदरम्यान देशातील अनेक प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. तसेच पंतप्रधानांनी यावेळी सांगितले, की फक्त स्वच्छतागृहांची निर्मिती केल्यामुळे देश स्वच्छ होणार नाही. तर यासाठी स्वच्छतेची सवय लावून ही सवय दैनंदिन जीवनात वापरल्यास हे साध्य होऊ शकते. या चळवळीदरम्यान मोदींनी दिल्लीतील शाळेत स्वच्छता मोहीम राबवली. तर अमित शहा यांनी हैदराबादच्या भीमा मैदान रस्त्यावरील एनटीआर मैदानात स्वच्छता ही सेवा चळवळीत सहभागी झाले.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानात केलेल्या सहकार्याबद्दल अमिताभ बच्चन आणि रतन टाटा यांचे आभार मानले. अमिताभ बच्चन यांनी स्वच्छतेसाठी जनजागृती केली, त्यासाठी त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आहेत.