Saturday, February 23

पंड्या आणि अश्विन हे ऑलराऊंडर नाहीत : सुनील गावस्कर

नवी दिल्ली, भारत विरुद्ध इंग्लंड  : इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने कसोटी मालिका गमावली. त्यानंतर भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी संघाच्या कामगिरीवर तोफ डागली आहे. हार्दिक पंड्या आणि आर. अश्विन हे दोघेही अष्टपैलू खेळाडू नाहीत, असा स्ट्रेट ड्राइव्ह लगावला आहे.
गावस्कर यांनी अश्विन आणि पंड्या यांच्यावर टीका करताना सांगितले की, ” अश्विन आणि पंड्या या दोघांना लोकं ऑलराऊंडर म्हणतात, पण मी त्यांना तसे मानत नाही. कारण या दोघांकडेही संघाला सामना जिंकवून देण्याची सुवर्णसंधी होती. पण या दोघांनीही ही संधी लाथाडली. या दोघांकडे चांगली गुणवत्ता आहे, पण त्यांना एक ऑलराऊंडर म्हणून सिद्ध करता आलेले नाही. ”
इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत कसोटी मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले होते. भारताने चौथा सामना जिंकला असता तर त्यांना मालिकेत बरोबर करता आली असती. चौथ्या सामन्यात भारताला विजयाची संधी होती, पण भारतीय खेळाडूंनी अपरिपक्व खेळ केला आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला.