Sunday, January 20

दीर्घकाळापासून मिथुन चक्रवती ‘या’ आजाराने आहेत त्रस्त, रुग्णालयात उपचार सुरु

बॉलिवूडचे अभिनेता मिथुन चक्रवती गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मिथुन यांच्यावर दिल्लीतल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 65 वर्षीय मिथुनदा यांना गतवर्षीपासून हाइबरनेशन नावाच्या आजाराने ग्रासले आहेत. रिपोर्टनुसार अनेक दिवसांपासून त्यांना पाठीचे दुखणे सुद्धा आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार पाठिच्या दुखण्यावर उपचारासाठी ते अमेरिकेला गेले होते. त्यानंतर ते काही दिवस आपल्या उटीमधल्या घरी रहायला गेले होते. त्यानंतर थोड्याशा कालावधीसाठी ते  छोट्या पडद्यावर परतले होते. शेवटचे मिथुनदा आयुष्यमान खुरानाच्या  ‘हवाईजादा’ चित्रपटात दिसले होते.  बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार मिथुन यांच्या प्रकृती सुधारणा होते आणि लवकरच ते बरं होतील.
मिथुनदा यांच्या पाठीच्या दुखण्या मागचे कारण त्यांनी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान केलेला स्टंट आहे. त्याचे झाले असे की 2009 मध्ये इमरान खान आणि संजय दत्त यांचा चित्रपट ‘लक’च्या शूटिंग दरम्यान मिथुनदा यांनी स्टंट केला होता. हा स्टंटसाठी त्यांनी चॉपर मधून उडी मारायची आहे मात्र त्यांचे टायमिंग चुकले आणि ते खाली पडले. हा स्टंट करताना त्यांना दुखापत झाली. मिथुनदादा रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्समध्ये जजच्या भूमिकेत दिसले होते. मिळालेल्या माहितीनुसार दादा राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटात एका मुख्य भूमिकेत दिसू शकतात. याशिवाय ते विवेक अग्निहोत्रीचा द ताशकंद फाइल्सचा सुद्धा भाग आहेत. यात त्यांच्यासोबत नसीरुद्दीन शाहपण दिसणार आहेत. हा एका पीरियड-थ्रिलर चित्रपट आहे.
मिथुनदा यांचा खूप मोठा फॅन फ्लॉईंग आहे. त्यांच्या जमान्यातील खास करुन छोट्या शहरांमध्ये मिथुनदा यांच्या चित्रपटाचे खूप क्रेझ असायचे.  छोट्या शहरांमध्ये मिथुन यांचे चित्रपट रिलीज झालेल्यावर अनेक दिवस तिकिट खिडक्यांवर हाऊसफुलचा बोर्ड असायचा.