Saturday, February 23

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चं पोस्टर लीक

या वर्षीचा सर्वात मोठा चित्रपट अशी चर्चा असलेला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाविषयी रोज नवनवीन चर्चा रंगताना दिसत आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकताही कमालीची वाढल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान या चित्रपटातील एक पोस्टर लीक झाल्याचं समोर येत आहे.
बहुचर्चित ठरत असलेला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यापूर्वी या चित्रपटातील भूमिकांवरुन पडदा दूर सारला जात आहे. नुकताच या चित्रपटातील आमिरच्या भूमिकेवरील पडदाही दूर करण्यात आला आहे. मात्र या हा फोटो प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाचं एक पोस्टर लीक झाल्याचं समोर आलं आहे. लीक झालेल्या या पोस्टरमध्ये आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख दिसून येत आहेत.
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या या पोस्टरमध्ये ही चारही कलाकार मंडळी अॅक्शन पोझमध्ये दिसत आहेत. हे पोस्टर २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार होतं. मात्र त्यापूर्वीच ते लीक झालं आहे. हा चित्रपट फिलिप टेलरच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग्स’ या कांदबरीवर आधारलेला आहे. २७ सप्टेंबरला या चित्रपटाचा पाहिला ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. तर ८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.