Saturday, February 23

जस्लीन मथारू अनूप जलोटा यांच्यापासून गर्भवती होती का?

बिग बॉसच्या १२ व्या पर्वाला सुरुवात झाल्यापासून भजन सम्राट अनूप जलोटा (६५) आणि त्यांची प्रेयसी जस्लीन मथारू (२८) या दोघांचीच चर्चा आहे. बिग बॉसच्या यंदाच्या पर्वात जोडीदार ही थीम ठेवण्यात आली आहे. बिग बॉसमधील अन्य स्पर्धकांच्या तुलनेत अनूप जलोटा आणि जस्लीन यांचीच सर्वाधिक चर्चा होतेय त्यामागे कारणही तसचं आहे. दोघांच्या वयामध्ये थोडेथोडके नव्हे तर तब्बल ३७ वर्षांचे अंतर आहे.
आता या जोडीबद्दल नवीन धक्कादायक खुलासा झाला आहे. मागच्यावर्षी जस्लीन अनूप जलोटा यांच्यापासून गर्भवती होती. नंतर तिने स्वत:चा गर्भपात करुन घेतला असा खळबळजनक दावा मॉडेल अनिशा सिंह हिने केला आहे. अनिशा सिंह अनूप जलोटा यांची निकटवर्तीय मानली जाते.
अनिशा सिंहने सांगितले कि, अनूप जलोटा आणि जस्लीन ऐकमेकांच्या अंगावर ओरडत होते. यापूर्वी मी दोघांना इतक्या रागात कधी पाहिले नव्हते. जलोटांच्या निष्काळजीपणामुळे आपण गर्भवती राहिलो असे जस्लीन सांगत होती. त्यानंतर काय घ़डले मला माहित नाही. जलोटा खराब मूडमध्ये होते. त्यांनी मला तिथून निघून जाण्यास सांगितले. त्य़ानंतर दोन ते तीन दिवसांनी ते मला भेटले. नंतर मला जस्लीनने गर्भपात करुन घेतल्याचे समजले.
काही दिवसांनी माझ्या बरोबर बोलत असताना जलोटा मला म्हणाले कि, जस्लीन माझी फसवणूक करतेय असे मला वाटते. तिचा यूकेमध्ये प्रियकर असावा. जस्लीनने नेहमीच त्यांचा हा आरोप फेटाळून लावला. जस्लीनसोबत नाते ठेवताना त्यांच्या मनातील असुरक्षितेतची भावना ते नेहमी मला बोलून दाखवायचे व काय केले पाहिजे असा सल्ला मला नेहमी विचारायचे असे अनिशाने सांगितले.