Tuesday, December 18

जपानच्या मसाझो आजोबांचं वय 112 वर्ष, गिनीज बुकमध्ये नोंद

जपानमधले मसाझो नोनाका यांच्या नावावर जिवंत असलेल्या जगातल्या सर्वात वृद्ध व्यक्तीचा विक्रम नोंदवला गेलाय. त्यांचं वय आहे 112 वर्षं. जपानच्या ओकायदो नावाच्या बेटावर ते राहतात. तिथे जाऊन गिनीज बुकच्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रशस्तीपत्र दिलं.
त्यांच्या नीतानं त्यांच्या तब्येतीमागचं रहस्य सांगितलं. थोडंसं गोड खाणं आणि गरम पाण्यानं अंघोळ करणं, यामुळे ते फिट राहतात, असं नात युकोचं म्हणणं आहे. त्यांना व्हीलचेअरची गरज लागते, पण ते फिट आहेत. वृत्तपत्र वाचल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही. तरुणपणी ते शेतीचा व्यवसाय करायचे.