Saturday, February 23

चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात मोईन अलीचा समावेश

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड  : भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. इंग्लंडच्या संघात अष्टपैलू मोईन अलीला यावेळी स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आदिल रशिद आणि मोईन अली हे दोन फिरकीपटू इंग्लंडचा संघ या सामन्यात खेळवणार आहे.