Sunday, January 20

करिनाने नाकारलेला सिनेमा ‘या’ अभिनेत्रीला मिळाला

करिनाला मराठी सिनेमा आपला माणूसच्या हिंदी रिमेकची ऑफर आली होती. या सिनेाची निर्मिती आशुतोष गोवारिकर करणार असून याबाबत आशुतोष यांनी करिनाशी चर्चा केली आहे. मात्र करिनाने या सिनेमांत काम करण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे करिना आपला माणूसच्या रिमेकचा भाग नसणार आहे. डीएनएच्या रिपोटनुसार, सिनेमांत जे बदल करण्यात आले ते करिनाला फारसे रुचले नाहीत. ती लवकरच राज मेहता दिग्दर्शित चित्रपटात झळकणार आहे. ज्यात ती अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

करिनाने नकार दिल्या नंतर आशुतोष या चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हाशी चर्चा करतो आहे. सोनाक्षीला या सिनेमाची स्क्रिप्ट खूप आवडली आहे त्यामुळे आता आपला माणूसच्या रिमेकमध्ये आपल्याला सोनाक्षी सिन्हा दिसण्याची शक्यता आहे. सोनाक्षीचे फिल्मी करिअर गेल्या काही काळापासून फारसे सुस्थितीत नाही. तिचे एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप होत असल्याने तिला एका सुपरहिटची अत्यंत आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला तिचा ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ हा चित्रपटदेखील बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरला.