Tuesday, December 18

उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडला ‘व्हेल’ मासा

उरण, उरणच्या खारदांडा समुद्रकिनारी व्हेल मासा सापडला आहे. 30 ते 35 फूटाचा हा मासा मृतावस्थेत आढळला असून त्याला पाहायला आजूबाजूच्या गावकऱ्यांनी गर्दी केली आहे.
गुरुवारी सकाळी मच्छिमार जेव्हा समुद्रकिनारी जात होते. त्यावेळी त्यांना समुद्रकिनाऱ्यालगतच्या झुडुपांजवळ हा अवाढव्य मासा आढळून आला. समुद्राला भरती आलेली असताना हा मासा इथपर्यंत आला आहे. ग्रामस्थांनी याबाबत पोलिसांना कळविले असून लवकरच माश्याला या ठिकाणाहून हलविण्यात येणार आहे.