Saturday, February 23

आपल्या व्हर्जिनिटीचा लिलाव करतेय ही 19 वर्षीय तरुणी, 10 कोटी रुपये ठेवली किंमत

लंडन, ब्रिटनची रहिवासी 19 वर्षीय अॅमी आपल्या व्हर्जिनिटीचा लिलाव करू इच्छिते. जेणेकरून तिला शिक्षणाचा खर्च भागवता येईल आणि कुटुंबालाही हातभार लावता येईल. यासाठी तिने सिंड्रेला एस्कॉर्ट्स नावाच्या एजन्सीशी संपर्कही केला आहे. या एजन्सीने आपल्या वेबसाइटवर दावा केला आहे की, तरुणीची व्हर्जिनिटी सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे डॉक्टरांचे सर्टिफिकेटही आहे आणि जर खरेदीदाराची इच्छा असेल तर तो स्वत:सुद्धा टेस्ट करू शकतो.
व्हर्जिनिटीच्या लिलावाची सुरुवातीची रक्कम 1 मिलियन पाउंड म्हणजे तब्बल 10 कोटी रुपये ठेवण्यात आली, तथापि एमीला यापेक्षा जास्त पैसे मिळण्याची अपेक्षा आहे.
ब्रिटिश मीडियानुसार एमीने सांगितले- ‘मी सिंड्रेला एस्कॉर्ट्सच्या माध्यमातून माझे कौमार्य विकू इच्छिते. मी खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. एमी म्हणते ‘ही माझ्या आयुष्याला उत्तम करण्याची संधी आहे. माझ्या कुटुंबाची मदत करण्याची आणि त्यांना काहीतरी परत करण्याची संधी आहे. आणि यासाठी त्यांचीही संमती आहे.’ एमीला शॉपिंग करणे आणि फिरणे पसंत आहे. फीस जमा करण्यात आणि कुटुंबीयांच्या मदतीनंतर जे पैसे वाचतील त्यातून एमी शॉपिंग आणि वर्ल्ड टूर करणार आहे. आपल्या निर्णयावर एमी म्हणते, ‘हे माझे शरीर आहे आणि मला वाटते की, मी सक्षम आहे जे काही मला करायचे आहे त्यासाठी!’
बोली लावणाऱ्यांना एजन्सीमध्ये 10 टक्के रक्कम जमा करावी लागेल, जेणेकरून हा ‘गंभीर प्रस्ताव’ असल्याचे नक्की होईल. एजन्सीनुसार, बोली लावणाऱ्या व्यक्तीला एमीसोबत रात्र घालवण्यासाठी जर्मनीला जावे लागेल, जेथे शरीरविक्रीला कायदेशीर मान्यता आहे. एजन्सीच्या मते, एमी पूर्णपणे व्हर्जिन आहे, मेडिकल एक्स्पर्टकडून तपासणीनंतर तिला तसे सर्टिफिकेटही देण्यात आलेले आहे.