Tuesday, December 18

आता दिवंगत अभिनेत्री मधुबालावरही बायोपिक

बॉलिवुड जगतातील सदाबहार अभिनेत्री मुधबाला यांचा जिवनपट चित्रपटाच्या भव्य पडद्यावर लवकरच झळकणार आहे. आपल्या नितांतसुंदर सौंदर्याने अवघे बॉलिवुड आणि जगभरातील चाहत्यांना भूरळ घालणाऱ्या मधुबालावर बायोपिक बनणार आहे. मधुबाला यांची छोटी बहिण मधुर ब्रिज भूषण हीसुद्धा एक जबरदस्त अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवुडमध्ये आपले स्थान निर्माण केले. त्यामुळे मधुबालाच्या निधनानंतर तिला त्यावेळी टॉप असणाऱ्या डायरेक्टर्स-प्रोड्युसर्सनी अनेकदा ऑफर दिली की, मधुबालावरील चित्रपटाचे हक्क द्यावेत. पण, ब्रज भूषणने कोणाचे ऐकले नाही. त्यामुळे मधुबालावरील बायोपिक बनलेच नाही.
दरम्यान, प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार ब्रिज भूषणने मधुबालावर बनणाऱ्या चित्रपटाचे राईट्स एका प्रोड्युसरला दिले आहेत. मात्र, हा प्रोड्युसर नेमका कोण आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, मधुबालाची बहिण ब्रिज यांनी बायोपिकबाबत बोलताना सांगितले की, मी आपल्या बहिणीवर (मधुबाला) बायोपिक बनविण्यासाठी तयार आहे. माझे काही मित्र लवकरच ही बायोपिक प्रोड्यूस करतील. पण, मधुबालाचे चाहते, बॉलिवुडशी संबंधीत सर्व लोक या सर्वांना माझी एकच विनंती आहे की, कृपा करून माझ्या अनुमतीशिवाय कोणीही मधुबालाच्या जीवनावर बायोपिक किंवा इतर काही बनविण्याचा प्रयत्न करू नये. दरम्यान, ही बायोपिक कशी असेल, त्यात मधुबालाची व्यक्तिरेखा कोण साकारेल याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.