Saturday, February 23

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

जलपायगुडी, जलपायगुडी जिल्ह्यात एका तयार होणाऱ्या इमारतीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. मंगळवारी सायंकाळी जलपायगुडी सदर ब्लॉकमधील जहूरी तालमा भागात घडली. घटना घडली त्या वेळी पीडित मुलगी आपल्या बहिणीच्या घरी चालली होती, असे पोलिसांनी सांगितले.
दोन तरुणांनी सायकलवरून जाणाऱ्या पीडित मुलीला थांबविले आणि जबरदस्तीने तिला पकडले. त्यानंतर ते एका इमारतीमध्ये घेऊन गेले, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. अन्य तीन जण तेथे थांबले होते. त्यानंतर त्यांनी सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जसजसे नागरिक घटनास्थळी जमायला लागले तसे आरोपींनी पलायन केले, असे पोलिसांनी सांगितले.