Tuesday, December 18

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कोचींग क्लास मालकाला अटक

बरेली, बरेली जिल्ह्यातील दहावीच्या वर्गात शिकाणार्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी एका खासगी शिकवणी (कोचींग) क्लासच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. ही मुलगी सात महिन्यांची गरोदर असून, गर्भ पाडण्यासाठी तिने गर्भनिरोधक गोळी खाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. यानंतर हे प्रकरण पुढे आले.
दिपक सक्सेना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, शहाबाद दिवाखाना येथे खाजगी कोचींग क्लास चालवत होता. मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात पिडीत मुलीने या कोचींग क्लास मध्ये प्रवेश घेतला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्सेना हा एका खाजगी अभियंत्रीकी कॉलेज मध्ये सहाय्यक प्राध्यापक आहे. त्याने 17 नोव्हेंबर 2017 ला पहिल्यांदा पिडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. हे प्रकरण कोणाला सांगितल्यास तुझ्या आई-वडीलांना मारून टाकण्याची धमकी तिला देण्यात आली होती. दिपक सक्सेना याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिस अधिक्षक अभिनव सिंह यांनी सागितले.