Saturday, February 23

अरबाज आणि जॉर्जिया लवकरच होणार पती-पत्नी?

जॉर्जिया एंड्रियानी आणि अरबाज खानची लव्ह स्टोरी ही आता सगळ्या जगाला माहिती आहे. सध्या दोघे प्रेमाच्या अखंड सागरात बुडाले आहे. दोघांना अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आले आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दोघांच्या कुटुंबीयांनी देखील एकमेकांची भेट घेतली आहे.
स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार अरबाज खान आणि गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसोबत पुढच्या वर्षापर्यंत कोर्ट मॉरेज करणार असल्याचे समजतेय. सूत्रांच्या माहितीनुसार दोनही कुटुंबीयांनी या नात्याला संमती देखील दिली आहे. त्यामुळे आता हे कपल पुढच्या वर्षीपर्यंत लग्नाच्या बंधनात अडकू शकतो.  अरबाज खानला जॉर्जिया एंड्रियानीला बॉलिवूडमध्ये लाँच करायचे आहे. यासाठी त्यांने प्रोफेशनल एजेंसीदेखील हायर केली आहे. यावरुन एक स्पष्ट होतेय की जॉर्जियाला लाँच करण्यासाठी अरबाज खूपच मेहनत घेतो आहे.
गत ४ आॅगस्टला अरबाजने आपला ५१ वा वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत अरबाजने जियोर्जियासोबतचे नाते जगजाहिर केले होते. या पार्टीत अरबाजची एक्स-वाईफ मलायकाही सामील झाली होती. त्यामुळे तिला अरबाजच्या या नव्या नात्याबद्दल काहीही आक्षेप नाही, हे उघडचं आहे. त्यामुळे लवकरच भाईजानच्या घरी लगीनघाई सुरु झालेली दिसली तर त्याचे आश्चर्य वाटायला नको.
अरबाज खान सध्या त्याच्या आगामी ‘दबंग-३’च्या तयारीला लागला आहे. भारतनंतर सलमान दबंगचे शूटिंग करणार आहे. आतापर्यंत आलेले दबंगच्या सिरीज हिट झाल्या आहेत. सलमानच्या अपोझिट कोण झळकणार हे अद्याप कळलेले नाही. मात्र सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट झाल्याचे कळतेय. या सिनेमाच्या सीक्वलचे दिग्दर्शन प्रभूदेवा करणार आहे. याआधी दबंगचे दिग्दर्शन अभिनव कश्यपने केले होते. ‘दबंग 2’ चे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते. याचित्रपटातही चुलबुल पांडेची स्टोरी असणार आहे.