Saturday, February 23

अभिनेत्री उषा जाधवही कास्टिंग काउची शिकार

गेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काउचचा मुद्दा भडकतोय. श्री रेड्डी या तेलगू अभिनेत्रीने कास्टिंग काउच विरोधात टॉपलेस प्रदर्शन केले होते..दोन दिवसापुर्वी नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी कास्टिंग काउचचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते..बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री राधिका आपटे हिनेही फिल्म इंडस्ट्रीतील कास्टिंग काउच बद्दलचे सत्य मांडले होते…आणि आता राष्ट्रीय पुरस्कार विजेती ‘धग’फेम अभिनेत्री उषा जाधव हीने तिच्यासोबत झालेला कास्टिंग काउच प्रकार उघडकीस आणला आहे.
उषा जाधवने खुलासा केला आहे की, इंडस्ट्रीत कास्टिंग काउच म्हणजे सामान्य आहे. मला जर सिनेमासाठी संधी दिली जाईल तर त्याबदल्यात मी समोरच्याला काय देऊ शकते, अशी विचारणाही मला केली गेली. तेव्हा मी त्याला म्हटले की माझ्याकडे पैसे नाहीत. हे ऐकुन तो मला म्हणाला की, ‘पैसे नकोय. पण जर प्रोड्यूसर किंवा डायरेक्टरला किंवा दोघांनाही तुझ्यासोबत झोपायचं असेल तर…’ हे सगळं बोलताना त्या एजंटने मला घाणेरडा स्पर्शही केला.
उषाला सिनेमात काम करायचे होते म्हणून ती घरून पळून मुंबईत आली होती. मुंबईत एका कास्टिंग एजंट कडून तिचे लैगिंक शोषण झाल्याचे ती सांगते.